पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरुध्द धुळ्यात
राष्ट्रवादी युवक कॉंगे्रस श.प.वतीने आंदोलन
धुळे जिल्हा
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरात केंद्र सरकारने केलेली भरमसाठ भाववाढ आणि वाढत्या महागाई विरोधात आज राष्ट्रवादी युवक कॉंगे्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळ्यात जोरदार निदर्शेने करण्यात आली. यावेळी युवक शहराध्यक्ष वाल्मीक मराठे यांनी सिलेंडरचे प्रतिकात्मक दहन केले.
महेबूब भाई शेख यांच्या आदेशाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या महागाई वाढ धोरणाच्या विरोधात आज धुळ्यात गांधी पुतळ्यासमोर एल्गार करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष वाल्मीक मराठे प्रदेश सचिव भोला सैंदाणे युवक कार्याध्यक्ष निखिल भाऊ मोमाया युवक उपाध्यक्ष रुबाब पिंजारी युवक सरचिटणीस राजेंद्र भाऊ चौधरी युवक उपाध्यक्ष वैभव भाऊ पाटील राजु मशाल भीका नेरकर तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करुन लक्ष वेधले.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात घटले असतांना सुध्दा भारतात मात्र भरमसाठ वाढ करुन सामान्य नागरीकांची लुट चालवली असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष वाल्मीक मराठे यांनी केला. केंद्र सरकारचा निषेध करीत आज राज्यभरात राष्ट्रवादी युवक कॉंगे्रस आंदोलन करीत रस्त्यावर उतरले असल्याचे सांगितले.