मा.नगरसेवक बंटी मासुळेंच्या पुढाकाराने क्रांती चौकात श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे लोकार्पण

मा.नगरसेवक बंटी मासुळेंच्या पुढाकाराने क्रांती चौकात
श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे लोकार्पण

धुळे – उन्हाळ्याचा कडाका वाढला असून कडकडीत उन्हात वाटसरुनांना थंड पाण्याची सोय व्हावी म्हणून सालाबादाप्रमाणे मिलपरिसरात क्रांती चौक येथे श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान तसेच भाजपाचे माजी नगरसेवक अमोल उर्फ बंटी मासुळे यांच्या वतीने यंदाही सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. श्री द्वारकाधीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही जनसेवा केली जात आहे.


मील परिसरातील युवा मा. नगरसेवक अमोल (बंटी) मासुळे यांनी श्री द्वारकाधिश प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदाही मोफत पाणपोई चितोड रोडवरील क्रांतीचौकात सुरु केली आहे. मील परिसरातील शेकडो कॉलन्यांतील रहिवाशांसह चितोड, रावेर, दह्याणे, बह्याणे या गावातील ग्रामस्थांची चितोड रोड मार्गावर कायम वर्दळ असते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने क्रांतीचौकात पाणपोई सुरु करून सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवीत असतात. नगरसेवक बंटी मासुळे यांना श्री द्वारकाधिश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परम् गोभक्त रविंद्र बापुजी शेलार यांचे मार्गदर्शन लाभते.


यंदाही हनुमान जयंतीचे औचित्य साधत क्रांती चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनिल पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे, किशोरआप्पा सरगर, मनोज गर्दे, गौतम पगारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिल परिसरातील किशोर शिंदे, सुरेश जाधव, बुरा भाऊ रगडे, बंडू नाना पवार, अशोक बाविस्कर, सचिन पाटील, संतोष खामकर, विनायक भोसले, प्रताप पाटील, विद्यानंद सोनवणे, प्रवीण पाटील, साहेबराव चौधरी, विनायक पुराणिक, वाल्मीक धनगर, वसंत देवरे, सुधाकर येवला, एस आर पाटील, साळुंखे रतन, पी बी धनगर, राजेंद्र राणा, सुरेश अंपळकर, छोटू वाणी, युवराज मराठे, दिलीप गायकवाड, मंगेश सरगर, किरण डोमाळे, रवींद्र सरगर, राज सरग, दीपक वायखिंडे, हेमंत दळे, जितेंद्र गलांडे, संदीप पवार, बाळा वाघमोडे, कृष्णा दळे, पै.भटू गवळी, श्रीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, गोविंदा सोनवणे, मुकेश थोरात, नितीन आखाडे, लक्ष्मण चव्हाण, किरण हाके, प्रशांत सूर्यवंशी, नयन गुल्हाने, वनराज पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *