सर्व कार्यालय प्रमुखांनी 10 मुद्दांवर आधारीत मुल्यमापन
अहवाल सादर करावा- अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर
धुळे जिल्हा
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांच्या कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या शंभर दिवस कृती आरखड्याचा अंतिम मुल्यमापन अहवाल सर्व कार्यालय प्रमुखांनी विहीत वेळेत सादर करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतिम मुल्यमापन अहवालाबाबत बैठक आज संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. बोरकर बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उप विभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री.बोरकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात 100 दिवस कृति आराखड्याची अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यात जिल्हास्तरावर 54 कार्यालय तसेच तालुकास्तरावर 28 क्षेत्रीय कार्यालयांनी या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेचे मूल्यमापन अहवाल पीपीटी स्वरुपात सादर करावा. या मूल्यमापन अहवालात संकेतस्थळ, सुकर जीवनमान, तक्रार निवारण, कार्यालयीन सोई सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफीस प्रणाली, आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविण्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश असावा. या प्रत्येक बाबीस गुणांकन असल्याने प्रत्येक विभागांने उत्कृष्ट सादरीकरण तयार करावे. जेणेकरुन धुळे जिल्ह्यातील कार्यालयांना राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर तसेच तालुका, उपविभागस्तरावर जास्तीत जास्त पारीतोषिक मिळतील. यादृष्टीने प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्याल, महानगरपालिका, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागाने कृति आराखड्यातंर्गत केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनीही मार्गदर्शन केले.
000000