धुळ्यात हरवलेले ३० मोबाईल शोधण्यात यश

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मालकांना केले परत
 
धुळे जिल्हा
धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले जवळपास ३० मोबाईल हँडसेट आणि काही स्मार्टफोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आज पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोबाईल मालकांना परत केले.
विविध ठिकाणाहून चोरी झालेले आणि हरविलेले हे फोन एक महिन्याचा आत पोलिसांनी जप्त केले आहे. सीईआरआय  (सेन्ट्रल इक्युल्पमेट आयडन्टी रजिस्टेशन) द्रवारे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोकॉ. योगेश विजय ठाकुर यांनी हा तपास केला. पोलिसांनी विविध कंपनीचे तीस स्मार्टफोन गुजरात, आसाम, मध्यप्रदेश, राजस्थान, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव व मालेगाव अशा जिल्हयातुन हस्तगत केले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिठाण्याचे  अंमलदार पोकॉ.योगेश विजय ठाकुर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *