धुळ्यात सर्वपक्षीय नेते, सामान्य नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली
धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना धुळेकर नागरिक आणि विविध राजकिय, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर धुळे जिल्ह्यात देखील तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सोमवारी सांयकाळी अस्थिकलश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजवाडे संशोधन मंडळ धुळे येथे सायंकाळी 5 वाजता स्व. अजितदादा पवार यांचा अस्थि कलश आणण्यात आला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी आमदार शरद पाटील, श्याम सनेर, अनिल मुंदडा, जोसप मलबारी, किरण पाटील, किरण शिंदे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, हिरामण आप्पा गवळी, अनिल दामोदर ज्ञानेश्वर भामरे, सुरेश सोनवणे, सुनील देशमुख, योगेश पाटील, सचिन दीक्षित, सचिन दहिते, निरंजन करणकाळ, सुनील बैसाणे, महिला अध्यक्ष जयाताई साळुंखे, संजीवनी पाटील, रंजना निकुंबे, चंद्रकला खैरनार आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी अस्थिकलेश दर्शन घेऊन स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि श्रद्धांजली अर्पण केली.