महापौर पदासाठी मायादेवी परदेशी यांना तर उपमहापौरपदी ज्योत्सना पाटील यांना भाजपतर्फे उमेदवारी

शिवसेना-राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीने भरले नामनिर्देन अर्ज

धुळे शहर

धुळे महापालिका महापौर पदासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने जेष्ठ नगरसेविका सौ.मायादेवी महादेव परदेशी यांनी तर उपमहापौर पदासाठी सौ.ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहेत.

धुळे महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ५० नगरसेवक विजयी झाले आहेत. दि. ६ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

धुळे महापालिकेत १९ प्रभागातून एकुण ७४ नगरसेवक निवडून आले आहेत. यात भाजपाचे ५०, एमआयएमचे १०, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ८ आणि शिवसेनेचे ५ तर एक अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे.

आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाच्या वतीने सौ.मायादेवी परदेशी यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी आपले नामनिर्देशन पत्र मनपा सचिवांकडे दाखल केले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर तसेच सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच विरोधी पक्षातर्फे राष्ट्रवादी कॉंगे्रस-शिवसेना यांच्या शहर विकास आघाडीच्या वतीने देखील उमेदवारी करण्यात येत असून महापौर पदासाठी शिवसेनेच्या सौ.गिता तुषार नवले यांनी आणि उपमहापौर पदासाठी इरफान फजलु अन्सारी यांनी नामनिर्देशन पत्र भरले आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रस-शिवसेना शहर विकास आघाडीचे एकुण १३ नगरसेवक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *