मुंबई
राज्यातल्या १२ जिल्हा परिषद (ZP election) आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. मात्र यात धुळे जिल्हा परिषदांचा समावेश नसून धुळे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर गेली अशी आहे.
निवडणूक जाहीर झालेल्या जिल्हा परिषदांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका आयोगाने आज जाहीर केल्या.
या निवडणुकांसाठी १६ जानेवारी पासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि २१ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येतील. २२ जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागतील.
या निवडणुकीत EVM चा वापर होणार असून विधानसभेच्या मतदार यादीत १ July २०२५ रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी १ आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मते द्यावे लागतील.
या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाने ५० टक्क्याने मर्यादा ओलांडली नसल्याने ही निवडणूक घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा आरक्षण 50 टक्केच्या वर गेल्याच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे रखडली असून आता 23 तारखेला होणाऱ्या सुनावणीवर पुढील दिशा स्पस्ट होणार आहे .