धुळ्यात रविवार ठरला ‘प्रचार वार’ !

धुळ्यात रविवार ठरला ‘प्रचार वार’ !

सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांनी काढल्या रॅली, नेत्यांच्या सभांही गाजल्या

धुळे जिल्हा

धुळे महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आज रविवारची संधी साधत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराचा जोर दिसून आला. दिवसभर शहरातील विविध भागात प्रचार फेऱ्या आणि मोटरसायकल रॅली तसेच घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देण्यात आला. तसेच सायंकाळच्या सत्रात जाहीर सभा, कॉर्नर सभा देखील मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार अनुप अग्रवाल यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. तसेच शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित या अनेक ठिकाणी प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी झाल्या तसेच जाहीर सभांनाही हजेरी लावली.

 

 

 

 

 

 

 

 

 

काँग्रेसच्या  खासदार शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, भाई नगराळे आदि नेत्यांनीही विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या धमाकेदार पत्रकातून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. जाहीर प्रचारासाठी अखेरचे तीन दिवस उरल्याने प्रचाराचा जोर सर्वत्र वाढलेला दिसतो आहे. त्यातही आजचा रविवार प्रचारवार ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *