रेशनकार्ड धारकांना मिळणार साखर ; धुळे जिल्ह्यात 4 हजार 534 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त 

*अंत्योदय कार्डधारकांनी 20 किलो प्रती दराने साखर प्राप्त करुन घ्यावी*

*धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांना ऑक्टो,2025 ते मार्च, 2026 मध्ये प्रति शिधापत्रिका 1 किलो दरमहा साखर वितरीत करणार आहे. अंत्योदय कार्डधारकांनी 20 किलो प्रती दराने साखर रास्त भाव दुकानदाराकडून प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव खेडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

धुळे जिल्ह्यातील 75 हजार 696 अंत्योदय कार्डधारकांना नियमित सहामाही साखरेचे नियतन एकूण 4 हजार 534 क्विंटल प्राप्त झाले आहे. माहे ऑक्टोबर,2025 ते मार्च, 2026 मध्ये अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका 1 किलो दरमहा याप्रमाणे 20 रुपये प्रती किलो यादराने साखर वितरीत होणार आहे. साखरेचा पहिला टप्पा धुळे जिल्ह्यातील सर्व गोदामापर्यंत वितरीत करण्यात आला आहे. साखर गोदामातून सर्व रास्त भाव दुकानदारापर्यंत वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.खेडकर यांनी कळविले आहे.

*तालुकानिहाय साखरेचा तपशिल*
धुळे तालुक्यात 23 हजार 947 अंत्योदय लाभार्थी कुटूंबासाठी 1 हजार 437 क्विंटल. साक्री 23 हजार 045 लाभार्थ्यांसाठी 1 हजार 380 क्विंटल, शिरपूर 14 हजार 387 लाभार्थ्यांसाठी 863 क्विंटल, तर शिंदखेडा तालुक्यासाठी 14 हजार 317 लाभार्थ्यांसाठी 854 क्विटल असे एकूण 4 हजार 534 क्विंटल साखरेचे नियतन माहे ऑक्टो 2025 ते मार्च 2026 करिता प्राप्त झाले आहे.

One thought on “रेशनकार्ड धारकांना मिळणार साखर ; धुळे जिल्ह्यात 4 हजार 534 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *