धुळे शहर
मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निम्मित राष्ट्रीय वूशू स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या आणि सहभागी झालेल्या खेळाडूंचा जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते , जिल्हा क्रीडा अधिकारी एम के पाटील आणि ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय वूशू स्पर्धेत मॉन्स्टर फाईट क्लबच्या खेळाडूंनी सब ज्युनिअर, ज्युनियर, सीनियर या वयोगटात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करून सहभाग नोंदविला.
यात
1) सोहम प्रल्हाद सूर्यवंशी
2) देशू संतोष परदेशी
3) तन्मय अविनाश पाटील
4) अनुराधा दिलीप चौधरी
5) पवन शरद ह्यालिज
6) दर्शन संजय गर्दे
7) किरण नथू कुराडे
8) योगेश दगडू पाटील खेळाडूंचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना मॉन्स्टर फाईट क्लबचे संचालक आणि वूशू असोसिएशन ऑफ धुळेचे सचिव श्री राहुल बर्वे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .