धुळे,येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळेमार्फत 21 एप्रिल ते 20 मे, 2025 या कालावधीत क्रीडा संघटनामार्फत सर्व वयोगटातील विद्यार्थी खेळाडूंना विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
हे प्रशिक्षण शिबीर नि:शुल्क असून विद्यार्थी खेळाडूंनी जिल्हा क्रीडा संकुल, देवपूर धुळे व गरुड मैदान, धुळे येथील प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक व खेळ संघटना प्रतिनिधी यांच्याकडे नाव नोंदविणे आवश्यक आहे. शिबीरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीरात क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक व विविध खेळ संघटनांचे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उन्हाळी शिबीरात नाव नोंदणीसाठी विविध खेळाच्या खेळाडूंनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्या आले आहे.
बास्केटबॉल मुद्रा अग्रवाल-7499636154, योगासन श्रीमती योगेश्वरी मिस्तरी-7507324814,
रायफल शुटींग कपील बागुल- 9922522865, लॉन टेनिस राम आमोदे-9545980540,बॅडमिंटन शरतान चौधरी-9623864930,गौरव कुमार-7020074601, फुटबॉल मोसीन शेख-9689988890,तलवारबाजी विशाल रॉय-9874585059,तायक्वांदो-शशिकांत कोते- 9175669333, जिम्नॅटिक्स सुनिल चौधरी-9422786244, ॲथलेटिक्स प्रमोद पाटील- (8888101753) व कुस्ती खेळासाठी सुनिल चौधरी-9422786244 यांचेशी संपर्क साधावा.हे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे होईल.
रोलर स्केटींग अजय चौरेसिया-8087898238, धनंजय पाटील-9421415600 यांचेशी संपर्क साधावा. हे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, धुळे व कमलाबाई कन्या शाळा, धुळे येथे होईल.
खो-खो श्रीमती श्वेता गवळी-9765097688, कबड्डी अखिल शेख-8421661515, बॉक्सींग दिनेश पाटील-8888804688, हॅण्डबॉल निखिल मोरे-8888109114, व्हॉलीबॉल मयुर बारी-9823052774 यांचेशी संपर्क साधावा. हे प्रशिक्षण गरुड मैदान, धुळे येथे होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंनी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी टिळे यांनी केले आहे.
000000