पोलिस अधिक्षक धिवरेंच्या भेटीने खुलला ‘त्यांच्या’ चेहर्‍यांवर ‘ईदचा नूर’..!

धुळे जिल्हा

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती आली. रमजान ईद निमित्ताने पोलिस अधिक्षकांनी मुस्लिम समाजातील सर्वसामान्य कष्टकरी नागरीकांच्या घरी जावून ईदच्या शुभेच्छा देत त्यांच्या कुटूंबासोबत ईदचा आनंद साजरा केला. या भेटीमुळे कष्टकर्‍यांच्या चेहर्‍यांवर ईदचा नूर खुलला..

समाजातील मुख्य घटकाला मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणारे सफाईकामगार, पावरलुम मजदुर, ड्रायव्हर, व इतर गरीब कुटुंबातील लोकांच्या घरी जाऊन अनोख्या पध्दतीने पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी यंदा ईद साजरी केली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सामाजिक कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते.

यात ईब्राहीम शेख (चाचा) रा.दिलदार नगर धुळे दोन्ही पायाने अंपगत्व तरी कुंटुबात उदरनिर्वाह करणार कोणी नाही म्हणून अंपगत्व वर मत करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

नबी अहेमद शेख सरदार रा.भोई गल्ली वडजाई रोड धुळे मिळेल ती मजुरी करुन उदरनिर्वाह करतात तसेच रसुल बेग बिसमिल्ला बेग रा.भोईगल्ली ,वडजाई रोड धुळे हे स्वतः अंपग एकच मुलगा आहे तो ही अंपग एवढ असुन लहान मोठ शिवणकाम करुन उदरनिर्वाह करुन आपल कुंटंब चालवतात. यांच्या घरी सुध्दा पोलिस अधिक्षक धिवरे गेले.

त्यासोबतच अब्दुल कादीर असगर अली ग.न.५ नुरानी मस्जिद जवळ देवपूर धुळे व्यवसाय पावरलुम मजुरी करुन आपल्या कुंटंबाचा उदरनिर्वाह करणारे आणि शोएब सलीम शेख सफाई कामगार (मेहतर) रा.मेहतर कॉलनी ६० खोली देवपूर धुळे अशा गोरगरीब च्या घरी जावुन धिवरे यांनी ईद साजरी केली. पोलिस अधिक्षकांच्या या पुढारामुळे यासर्व गरीब कुटूंबांना मनस्वी आनंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *