पुररेषेत भिंत असल्याने कारवाई होणारच अभियंत्यांचे आश्वासन
धुळे शहर
धुळ्यात पांझरा नदी पात्रात गॅबियन वॉल प्रकरणी शिवसेना उबाठाच्या वतीने आज पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना घेराव घालत कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पुररेषेत भिंत असल्याने कारवाई होणारच असे अभियंत्यांनी आश्वासन दिले.
साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील महेंद्र हॉटेलच्या मागील बाजुस पांझरा नदीच्या पात्रात पूररेषेत रेड मार्किंग मध्ये गॅबीयन पध्दतीचे भिंतीचे प्रचंड मोठे काम, म्हणजे नदीपात्राच्या मधोमध पुर्वेकडून पश्चिमेकडे जवळपास 1 किमी लांब 5 मीटर उंच व 2 मीटर रुंद अशा महाकाय भिंतीचे काम करण्यात आलेले आहे. ते काम अजूनही सुरू असून याबाबत सेनेच्या वतीने प्रांताधिकार्यांना विचारणा केली असता प्रांताधिकारी यांनी पाटबंधारे विभागाने,
याबाबत गट नंबर पाच हा पूररेषेत येत नसल्याबाबत उपविभागीय अभियंता पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग धुळे यांचा 15 जानेवारी 2014 रोजी चा अभिप्राय विचारात घेण्यात आल्याचे उत्तरात नमूद केले असून पाटबंधारे विभागाने त्यांची नदीपात्रातील पूररेषा ही अधिक वेबसाईटवर फायनल केलेली असून ही परवानगी कोणत्या महाभागाने दिली त्याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे पाटबंधारे विभाग (बांधकाम) यांना विचारणा करुन, प्रश्नांची सरबत्ती करत घेराव टाकण्यात आला.
गेल्या दहा दिवसापासून शिवसेनेच्या वतीने पांझरा पात्रातील तील गॅबियन वॉल प्रकरणी आंदोलन सुरू असून यात अप्पर तहसीलदार प्रांताधिकारी यांच्यासोबत पाटबंधारे विभाग धुळे, नगर रचना विभाग महानगरपालिका धुळे हा तितकाच दोषी असून या सर्व विभागांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा रॉयल्टी कर अधिकाऱ्यांनी संगणमताने बुडविला असून तो एक प्रकारे राज्य शासनाच्या विरोधात केलेला कट आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने मुळा मुठा नदीपात्रातील बांधकामाप्रकरणी दिलेला निवाडा तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचे 2018 चे परिपत्रक हे देखील कार्यकारी अभियंता यांना वाचून दाखवण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने पूररेषेतील बांधकामाबाबत याआधी अनेक मोठे प्रकल्प रद्दबातल ठरवले असताना आपण सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करून आपला विभाग देखील तितकाच दोषी असून पूररेषेतील विनापरवानगी बांधकाम आपण स्वतः अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तपासावे व ते जमीन दोस्त करावे , याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी व राज्याचे महसूल मंत्री , जलसंपदा मंत्री यांना देखील अवगत करावे, येत्या आठ दिवसात पांझरा पात्रातील भिंती बाबत कारवाई झालीच पाहिजेल अशी मागणी करत कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तासभर घेराव घातला.
या दरम्यान अभियंता सोनवणे यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबत कार्यवाही केली जाईल तसेच पूररेषेत असलेले बांधकाम हे पाडलेच जाईल, पूररेषा ही अंतिम झालेली असून ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेबसाईटवर तसेच पाटबंधारे खात्याच्या वेबसाईटवर फायनल असुन पूररेषेला कोणीही बाधा पोहचवुन काम करत असेल तर ते काम जमीन दोस्त केले जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील ,भरत मोरे, सुनील पाटील, प्रशांत ठाकूर ,अण्णा फुलपगारे, कपिल लिंगायत, संदीप चौधरी, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, युवा सेनेचे मनोज जाधव, पंकज भारस्कर, अजय चौधरी, सागर निकम, संदीप चौधरी ,अनिल शिरसाट ,अमोल ठाकूर, आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आठ दिवसात उचित कारवाई न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अभियंतांना कार्यालयात बसू दिले जाणार नाही असा इशारा देखीलज् शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.