भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन धुळे जिल्ह्यात उत्साहात साजरा
धुळे जिल्हा
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.
धुळे जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना व प्रकल्प राबवून सर्व लोकप्रतिनिधी व अधिकार्यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर धुळे पोलीस दलाचे आरपीआय परेड कमांडट मुकेश माहुले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना देऊन रिपोटींग केले. पालकमंत्री रावल यांनी धुळे जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या.
या समारंभास खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधिक्षक डॉ अजय देवरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, बालाजी क्षीरसागर, महादेव खेडकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, तहसिलदार प्रवीण चव्हाणके, अरुण शेवाळे, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी, आपदा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत दुसर्या टप्प्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या कार्यालय तसेच कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.