धुळे क्रीडा संकुल साठी दोन कोटीचा निधी मंजूर

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यामुळे धुळ्याच्या वैभवात भर

धुळे जिल्हा

धुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या सुविधा विकासासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामुळे आता या जिल्हा क्रीडा संकुलाचा मूलभूत सुविधा विकास होवून, आधुनिक सुविधा युक्त असे क्रीडा संकुल निर्माण होणार आहे अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याकडून राज्यातील विविध विभागीय आणि जिल्हा क्रीडा संकुलांसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये धुळे जिल्हा क्रीडा संकुलासाठी दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विषयी माहिती देताना मंत्री रावल पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सर्व सुविधा युक्त असे जिल्हा क्रीडा संकुल निर्माण व्हावे. या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये चालना मिळावी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धुळे जिल्ह्याचा खेळाडू पोहोचावा यासाठी सर्व सुविधायुक्त जिल्हा क्रीडा संकुल असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला प्रयत्न आहे.येणाऱ्या काळात या क्रीडा संकुलाला सर्वाधिक आधुनिक सुविधा युक्त बनवण्याचा आपला प्रयत्न राहील असे मंत्री जयकुमार रावल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *