धुळे
– मिलपरिसरातील प्रभाग क्र.१७ मध्ये डेंग्यु मलेरियाची संभाव्य साथ लक्षात घेवून या साथ आजारांच्या हद्दपारीसाठी प्रभागाचे माजी नगरसेवक तथा भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुळे यांनी विशेष तपासणी व फवारणी मोहिम हाती घेतली. त्यांनी प्रभागात जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण मोहिम सुरु केली आहे. त्यांच्या या मोहिमेबद्दल जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनात प्रभागातील अनेक वसाहतींमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या साथीला आळा बसावा यासाठी बंटी मासुळे यांनी ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यात डेंग्यु जनजागृती ऍबेटींगचा या मोहिमेत समावेश होता. डेंग्यु जनजागृती मोहिमेसाठी ४ ट्रॅक्टर लावण्यात आले होते.
रंगारी चाळ, शिवप्रभु कॉलनी, शिवकृष्ण कॉलनी, शिवसागर कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, हुडको वसाहत, रासकर नगर, गुरुकृपा नगर, तुळसाबाईचा मळा, विखेनगर, शेलारवाडी, जयभवानी चौक, सुदर्शन कॉलनी, सेवादास नगर, पेरुजी नगर, अण्णासाहेब पाटील नगर, कोतवाल नगर, विद्युत नगर, साने गुरुजी कॉलनी, साईदर्शन कॉलनी, जयमल्हार नगर, खोरे नगर, अहिल्यादेवी नगर भागांमध्ये जनजागृती मोहिम राबविण्यात आली. डेंग्यू मलेरियापासून बचावासाठीचे माहितीपत्रकं देखील जनतेला देण्यात आले.
मुख्य स्वच्छता निरीक्षक तथा महापालिकेच्या मलेरिया विभागाचे प्रमुख लक्ष्मण पाटील यांच्या देखरेखीखाली भटू वाघ, भटू देवरे, विलास चौधरी, विशाल अहिरे, निकम मॅडम, नंदलाल खांडेकर, अशोक कोठारी, गोकूळ पिंपळसे, आयुब शेख, दिपक शिरसाठ, अजय पडोळे यांनी ऍबेटींग केले. यावेळी मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून ६० ते ७० मनपा कर्मचारी सोबत घेऊन फवारणीचे चार ट्रॅक्टर,ऍबेटिंगची संपूर्ण टीम कार्यरत करून मोहिम राबवून घेतली.