आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने धुळ्यात रेड रन मॅरेथॉन व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

 

धुळे जिल्हा

महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटी, मुंबई अंतर्गत जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्ताने रेड रन मॅरेथॉन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धां नुकतीच यशस्वीपणे घेण्यात आली.

रेड रन मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दत्ता देगांवकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करण्यात आली. या 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत पुरुष गटातुन प्रथम क्रमांक प्रेमराज भटु बाबर, व्हि.डब्लु एस. महाविद्यालय, द्वितीय क्रमांक अनिकेत दिनेश लोधी, एस. एस. व्हि. पी. एस. महाविद्यालय, तृतीय क्रमांक – राहुल भोये, व्हि. डब्लु. एस. महाविद्यालय तसेच महिला गटातुन प्रथम क्रमांक बिंदुबाई पावरा, एच. आर. पटेल महिला कॉलेज, शिरपुर, द्वितीय क्रमांक निशा धनसिंग पावरा, एच. आर. पटेल महिला कॉलेज, शिरपुर, तृतीय क्रमांक पुनम माळी, एस. एस. व्हि. पी. एस कॉलेज, शिंदखेडा हे विजेते ठरले. या विजेत्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्ता देगावकर यांच्या हस्ते मेडल, ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात आली.

जिल्हा रुग्णालय, धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यालय जिल्हा रुग्णालय, धुळे यांचेमार्फत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ८ वी, ९ वी, ११ वी चे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी ऑनलाईन नोंदणी करून सहभागी झाले. या प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सार्थक सुनिल वारे, मयुर हायस्कुल, धुळे व्दितीय क्रमांक दिगविजय अतुल जाधव, मयुर हायस्कूल, धुळे तृतीय क्रमांक ईशान निलेश खैरनार, पिंपळादेवी हायस्कुल मोहाडी उपनगर, धुळे या विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख रक्कम जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दत्ता देगांवकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच सदर विद्यार्थ्यांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शितल पाटील यांनी एच. आय. व्ही. एडस् या आजाराबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दत्ता देगांवकर, प्रमुख पाहुणे विद्यावर्धीनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील होते. या कार्यक्रमात जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती शितल पाटील, जिल्हा पर्यवेक्षक विलास पाटील, नितीन पाटील, सचिन शेवतकर, गौरी गाळणकर, समुपदेशक निता खलाणे, नरेंद्र देवरे, बाबाजी पाटील, प्रविण सुर्यवंशी, आरीफ शहा, प्रविण पालीदकर, अशासकिय संस्थेचे हिरालाल भोसले, देविदास कडरे, भटु पंगुडकर, दुर्गेश पाचुंदे, एकनाथ महाजन, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक पल्लवी वाळके, प्रशांत पवार, राहुल अहिरे, सूर्यकांत गायकवाड आदिंचे सहकार्य लाभले. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *