धुळे जिल्हा
पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या मागणीसाठी जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले, ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून सभा घेतल्या, तक्रारी केल्या तरीही ढिम्म यंत्रणा जागची हलली नाही, म्हणून अखेर आज कापडणे (ता.धुळे) ग्रामस्थांनी गावातीलच शिवाजी चौकात थाळी नाद आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कापडणे गावात शुद्ध पाणी मिळावे म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे यांनी अनेकदा तोंडी आणि नंतर लेखी तक्रार अर्ज केला,तरीही काहीही फरक न पडल्याने संतप्त ग्रामस्थांनी नंतर उंच जलकुंभावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून दोन ग्रामसभाही झाल्या, तरीही थेंबभर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही.एवढेच काय,प्रशासनाकडून किंवा संबंधितांकडून या आक्रोशाच्या अनुषंगाने कुठली चौकशी देखील झाली नाही,की खुलासा करण्यात आला नाही.
गावातच असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत आंदोलकांना व ग्रामस्थांना दिलासा देखील मिळाला नाही.या पार्श्वभूमीवर अखेर ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज थाळीनाद आंदोलन केले.
याआंदोलनात भूषण ब्राह्मणे,आत्माराम पाटील,बालू नाना पाटील जितेंद्र पाटील,भटू आबा पाटील व ललित बोरसे आदिंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.गावाला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे,पण गावाकऱ्यांनाशुद्ध पाणी मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागते आहे.
१७ लाख खर्चाचा जल शुद्धीकरण प्रकल्प १५ दिवसात कार्यरत करणार असल्याचे आश्वासन दिले गेले,पण काहीही नवे घडले नाही.
ललित बोरसे म्हणाले,पहिली ग्रामसभा झाली, जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते,की देवभाणे धरणातील पाणी संबंधित ग्रामपंचायत उचलू देत नाही म्हणून शेजारच्या सोनगीर येथील धरणातून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करीत आहोत,पण देवभाने धरणावरून पाणी आणले तर प्रतिकुटुंबास पाणी पट्टीपोटी ९०० रुपये खर्च येईल आणि. तेच पाणी सोनगीरहून घेतले तर तब्बल. तीन हजार ५०० रुपये खर्च करावे लागतील हे गणित आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.किमान या आंदोलनातून एका कुटुंबाचे किमान दोन हजार ६०० रुपये वाचले असे म्हणावे लागेल.आगामी काळात जर पाणी मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.शुद्ध पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवीणार नाही असॅ ईशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
आंदोलनात नवल अण्णा पाटील,अरुण पाटील,उज्वल बोरसे, मिलिंद सरदार, भटू वाणी, राजू माळी,प्रेम राज गोसावी,रमेश माळी,छोटू माळी, दत्तात्रय माळी,भाऊसाहेब माळी, प्रणव बच्छाव, ज्ञानेश्वर पाटील,अमोल पाटील, भूषण सैंदाणे, सुनील पवार,मनोहर पाटील, दीपक भामरे,सचिन मोरे, विनोद भामरे, दुर्गेश पाटील, अशोक पाटील, पत्रकार जिजाबराव माळी, जगन्नाथ पाटील, विठोबा माळी, विशाल शिंदे, भाऊसाहेब माळी,प्रकाश माळी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.