धोकादायक ऑक्सिटोसिन इंजेक्शनची तस्करी करणार्‍या इसमाला धुळ्यात पकडले

 

धुळे जिल्हा

अधिक दुध मिळावे यासाठी म्हशींना दिले जाणारे ऑक्सिटोसिन इंजेक्शन या मानवी आरोग्यास हानिकारक असणा-या औषधाची चोरटी वाहतुक करणार्‍या मालेगावच्या एका इसमाला धुळे शहरात रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून रिक्षासह ८७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. २२ जुलै रोजी रात्री आठ वाजेला ही घटना घडली. अब्दुल सलाम निसार अहमद रा. मालेगाव जि.नाशिक संशयिताचे नाव आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरिक्षक नितीन करंडे,पंकज चव्हाण,रमेश शिंदे हे पेट्रोलींग करत असतांना पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळालेल्यामाहिती नुसार मालेगाव येथुन एक जण एका रिक्षातून (क्र.एमएच ४१बी-३४५९) म्हशींना पानवण्यासाठी लागणारे इंजेक्शन (संभाव्य ऑक्सिटोसीन) च्या बॉटल असलेल्या बॉक्सची चोरटी वाहतुक करीत असल्याने पोलीस पथक हे अवधान गावाच्या फाट्याजवळ पोहोचले.सापळा रचुन समोरून येणारी सम्शास्पद क्रमांकाची रिक्षा थांबविण्यात आली. यावेळी रिक्षासह इंजेक्शनाचे खोके असा ८७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
२३ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन विभाच्या सहायक आयुक्तांना यांना पत्र देण्यात आले. सहायक आयुक्त श्रीमती वर्षा महाजन यांनी मोहाडी नगर पोलीस स्टेशन येऊन पोलीस अधिकारी व दोन पंचासमक्ष पंचनामा केला. यावेळी रिक्षात ठेवलेले इंजेक्शनचे १० खोके त्यांना दाखविण्यात आले.

दुभत्या गुरांना पाणविण्यासाठी लावण्यात येणारे इंजेक्शन (संभाव्य ऑक्सिटोसिन) हे मानवी आरोग्यास हानिकारक असुन त्यामुळे स्त्रियांना वंध्यत्व, अनैसर्गिक गर्भपात, लहान बालकांना कॅन्सर, काविळ, पोटाचे आजार, श्वसनाचे आणि त्वचेचे इत्यादी गंभिर आजार होतात. तसेच प्राण्यांवर आत्याचार होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी चेतन झोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहाडी नगर पोलीस ठाण्यात अब्दुल सलाम निसार अहमद याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३,२१०,२७४,२७६ प्रा.छळ.प्रति.अधि.११(१) (ग), १२ अन्वये रिक्षा चालका विरुद्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नितिन करंडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *