धुळे जिल्हा
मालमत्ता करांच्या आकारणीमध्ये झालेली बेपरवाही आणि यातून कोट्यावधीं रुपयांच्या झालेला चुराडा याबद्दल जाब विचारत आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे महापालिका कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढीव बिलाची होळी करण्यात आली.
धुळे महानगरपालिकेने सद्यस्थितीत जुन्या पध्दतीने म्हणजेच २६% देखील मालमत्ता कराची आकारणी केल्यास धुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात चांगल्या पध्दतीची वाढ होऊ शकते. पण धुळे महानगरपालिका वाढीव मालमत्ता कराच्या टक्केवारी मागे लागल्याने नागरिकांमध्ये असंतोष तर आहेच, पण धुळेकरांची मानसिकता पाहता येणार्या काही वर्षांत धुळेकर नागरिक हा कर भरणारच नाहीत हे देखील मनपा प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे धुळे मनपाने एप्रिल व जून महिन्यात नागरिकांना दिलेली सर्व वाढीव मालमत्ता कराची बिले रद्द करण्याची घोषणा करावी व त्यानंतर संपूर्ण धुळे शहरातील मालमत्ता करांचे प्रभागनिहाय किंवा झोन निहाय पुन:मोजणी करुन त्यांचे अद्यावत रेकॉर्ड तयार करुन मगच इतर उपकरांची टक्केवारी आकारुन नागरिकांना मालमत्ताकरामध्ये दिलासा द्यावा , अशी मागणी करत शिवसेना वतीने आयुक्तांना घेराव टाकून महानगरपालिकेने जून महिन्यात दिलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या बिलांची महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ होळी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ,उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी,निंबा मराठे, सुनील पाटील, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, पंकज भारस्कर, दिनेश पाटील, विकास शिंगाडे, , संदीप चौधरी, संजय पाटील, नितीन देशमुख, सागर निकम ,सागर साळवे, नासिर पिंजारी, वैभव पाटील, हर्षल वाणी, राजू पाटील, चांद मिस्तरी, रविंद्र गावडे, जगदीश शिंदे, अमोल ठाकूर , अक्षय पाटील आदी उपस्थित होते.