धुळ्यात पकडलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना ९ महिने कैद

धुळे शहर

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धुळे शहरात पकडण्यात आलेल्या चार बांगलादेशी लोकांना धुळे येथील ७ वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एस.अडकीने यांनी आज नऊ महिने कैद व प्रत्येकी सहा हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास चौघांना एक महिना कैदेत ठेवण्याची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावलेल्या चौघांमध्ये तीन महिलांचाही  समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात ‘ऑलआउट’
सारख्या योजना राबवून अधून मधून शहरातील लॉज, हॉटेल आणि संशयास्पद ठिकाणे तसेच वाहनेही तपासण्यात येतात. अश्याच प्रकारे धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खाजगी लॉजमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी २३ डिसेंबर २०२४ रोजी अचानक छापा घालून मोहम्मद महताब बिलाल शेख,शिल्पी बेगम कबीर मुंशी,ब्यूटी बेगम मातुब्बर, रिपा माकोल मातुबर या बांगलादेशी एक पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले होते.या नंतर उद्या कारवाईचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडेच सोपवला होता,त्यांनीच तो पूर्ण केला.

पोलिसांनी केलेल्या तपासात  बांगलादेशी नागरिकांना भारतात वास्तव्य करण्याची परवानगी नसताना ते विना पारपत्र धुळ्यात थांबले असल्याचे आधी उघड झाले. वास्तव्य काळात चौघेही संशयित त्यांच्याकडील मोबाईल हँडसेटमध्ये असलेल्या एका वर्चुअल ॲप द्वारे बांगलादेशमध्ये संपर्क साधत होते.दर्यापूर (जि.अमरावती) आणि कारंगा (जि.वाशीम) जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बनावट चलन (नोटा) बनविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याचे उघड झाले.या अनुषंगाने चौघांवर आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
======
“पकडण्यात आलेले संशयितांवर पोलिसांनी सर्वप्रथम चोरीचा संशय घेतला आणि सकाळपासूनच त्यांच्यावर नजर ठेवली होती. यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यावर मात्र भलतीच माहिती हाती आली.त्यांच्याकडे पारपत्र नव्हतेच, पण चौघांकडील आधार कार्डही बनावट आढळले यामुळे संशय बाळावला आणि सर्व चारही संशयित बंगलादेशी असून ते गुन्हेगार असल्याची खात्री झाली.”
श्रीराम पवार 
पोलीस निरीक्षक 
(स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग,धुळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *