धुळे शहर
माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणार्या मुजोर, दांड, गुंड प्रवृत्तीच्या कर्मचार्यांना आठ दिवसाच्या आत बडतर्फ करावे आणि पोलीसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे २२ जुलै रोजी महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराला कुलूप ठोकू असा ईशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की नागरी सुविधांच्या मागणीसाठी भारतीय सेनेतील माजी सैनिक चंदू चव्हाण हे धुळे महानगर पालिकेत आले होते त्यांचे आंदोलन सुरु होताच महानगरपालिकेतील कर्मचार्यांनी त्यांना मारहाण केली.या मारहाणीचे चित्रीकरण धुळेकरांनी पाहिले.
महापालिका कार्यालयात अशा गुंड कर्मचार्यांची भरती केली आहे का असा प्रश्न या निवेदनातून करण्यात आला आहेसामान्य जनतेची कामे करण्याऐवजी मारहाण करण्यासाठी शासन पगार देते का? अशा मुजोर, दांड, गुंड प्रवृत्तीच्या कर्मचार्यांना आठ दिवसाच्याआत बडतर्फ करावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अन्यथा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडी महानगर पालिकेच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून आंदोलन करु असा ईशारा जिल्हाध्यक्ष अरविंद निकम,जिल्हा संघटक शंकर खरात उपाध्यक्ष आकाश बागुल यांनी दिला आहे. यावेळी चंद्रमणी वाघ,योगेश पगारे,विशाल महाले,राकेश मोरे,युवा शहराध्यक्ष गणेश जगदेव,आकाश कदम,भरत राजपुत,ईश्वर राजपुत,किरण मोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.