धुळे जिल्हा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व मॉडेल करिअर सेंटर आणि आर.सी.पटेल आर्टस ॲण्ड सायन्स कॉलेज, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 10 जुलै, 2025 रोजी एस.एम.पटेल ऑडिटोरियम हॉल फार्मसी कॅम्पस, करवंद नाका, शिरपूर येथे सकाळी 10 ते दुपारी 4.00 वाजेदरम्यान जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (ऑफलाईन) आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
यामेळाव्यात दहावी पास किंवा नापास, बारावी, आय.टी.आय,बी.एस, बी.कॉ, एम.कॉम,बी.एस.सी, डिप्लोमा इंजिनिअर, बी.ई. डिप्लोमा, एम.बी.ए या पात्रताधारक उमेदवारासाठी 2 हजार 2 रिक्तपदे उपलब्ध असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विविध 20 कंपन्या व आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच कौशल्य विकास व स्वंयरोजगाराबाबत विविध महामंडळाचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
*1 हजारहून अधिक जागांसाठी 20 नामांकित कंपन्या उपस्थित*
या मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी धुळे जिल्ह्यातील विविध आस्थापनामध्ये प्रशिक्षणार्थी यांची 100 पदे, मे.डिस्टिल एज्युकेशन ॲड टेक्नॉलॉजी यांची 150 पदे, युवाशक्ती फांऊडेशन, नाशिक 150 पदे, बॉश लिमिटेड,नाशिक 25 पदे, मे. नवभारत फर्टिलायझर लि. 15 पदे, डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि.नाशिक 17 पदे, यशस्वी ॲकाडमी फॉर स्किल, नाशिक 25 पदे, जी.जे.फूडस, जिन माता फूउ प्रोसेसर्स, धुळे 13 पदे, फ्यूजन मायक्रो फायनान्स लि. 30 पदे, जैन इंरिगेशन, जळगाव 30 पदे, धुप्र कोटेक्स प्रा.लि.शिरपूर, स्वातंत्र्य फायनान्स प्रा.लि. 70 पदे, जस्ट डायल, 15 पदे,रेण्डस्टॅण्ड इंडिया प्रा.लि. 20 पदे, धूत ट्रान्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजी नगर, मेरीक्यू व्हर्चरस प्रा.लि. 50 पदे, गोविंद एच आर सर्व्हिसेस 50 पदे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल, जळगाव 15 पदे, मंजुश्री हितेश प्लास्टिक, जळगाव 15 पदे, हिताची अस्टेमो, जळगाव 30 पदे, जये हिंद इंडिस्ट्रीज, पुणे 50 पदे, जॉन डीअर, पुणे 20 पदे. कॉजेट, नाशिक 35 पदे अशी 1 हजार 2 विविध रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याठिकाणी नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे.
*नोंदणी प्रक्रिया*
धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळावा या बटनावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील ऑफलाईन-1 (2025-2026) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. व पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदासाठी अर्ज करावेत.
*अधिक माहिती व मदतीसाठी*
नोंदणीबाबत अडचणी असल्यास https://www.mahaswayam.gov.in/ या पोर्टल संदर्भात संदिप बोरसे 9096097524 आणि https://ncs.gov.in पोर्टल संदर्भात मुकेश बोरसे 8600303484 वर संपर्क साधावा. तसेच कौशल्य , रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयम https://www.mahaswayam.gov.in/ पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते यांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्यायवती करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्पदास अनुसरुन ॲप्लाय करणे, तसेच करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्ट अप इत्यादी विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींची निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन अंतर्गत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत टोल फ्री क्रमांक 18001208040 सुरु करण्यात आला आहे.
रोजगार इच्छुक उमेदवारांनी किमान पाच प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून गुरुवार 10 जुलै, 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी एस.एम.पटेल ऑडिटोरियम हॉल फार्मसी कॅम्पस, करवंद नाका, शिरपूर जि.धुळे येथे उपस्थित राहावे. काही अडचण असल्यास कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02562-295341 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त श्री. वाकुडे यांनी केले आहे.