उत्तर महाराष्ट्रात गुरुपौर्णिमे पर्यंत पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता! पुणे वेधशाळेने दिला इशारा

पुणे

उत्तर महाराष्ट्रात तसेच राज्यातील २५ जिल्ह्यात गुरुपौर्णिमे पर्यंत पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असायचा पुणे वेधशाळेने दिला इशारा दिला आहे.

पुणे वेधशाळेचे वरिष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे की, आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै पर्यन्त नंदुरबार तसेच मुंबई सह संपूर्ण कोकण व विदर्भ अश्या १९ जिल्ह्यांत आणि जळगांव धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर अश्या ६ जिल्ह्यातील शिरपूर सिंदखेडा चोपडा यावल रावेर मुक्ताईनगर एदलाबाद सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी जुन्नर लोणावळा खंडाळा मावळ मुळशी वेल्हे भोर महाबळेश्वर जावळी पाटण शाहूवाडी बावडा राधानगरी चांदगड व लगतच्या परिसरात अश्या एकूण महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
त्यामुळे सह्याद्रीच्या घाट माथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी  गिरणा वैतरणा कश्यपी कडवा प्रवरा,भीमा नीरा इंद्रायणी मुळा मुठा कुकडी कृष्णा-कोयना, पंचगंगा वारणा दूधगंगा भोगावती ह्या नद्या कदाचित पूर-पाण्यासह दुथडीही वाहु शकतात.
– मध्यम पाऊस –

आता संपूर्ण मराठवाड्यातील ८ आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा तसेच वरिल जळगांव धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर  अश्या सह्याद्रीच्या अति पूर्वेकडील ६ जिल्ह्यातील उर्वरित वर्षच्छायेच्या तालुक्यातील प्रदेशात  आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे मंगळवार दि. ८ जुलै पर्यन्त  केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.  त्यापुढील २ दिवस म्हणजे बुधवार व गुरुवारी ९ व १० जुलै ला ह्याच भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची अपेक्षा करू या!

    – संमिश्र वातावरण –

शुक्रवार दि. ११ जुलै पासुन काहीशी उघडीप तर काहीशी रिमझिम, तर मधूनच सूर्यदर्शन अश्याच प्रकारच्या वातावरणाची शक्यता जाणवते.
अर्थात एकाकी वातावरणात काही बदल किंवा एखाद्या पाऊस-पूरक वातावरणीय प्रणाली उदभवल्यास त्या पुढे माहिती देता येईल. पुणे वेधशाळेचे वरिष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *