धुळे जिल्हा
माजी आमदार कुणाल पाटील भारतीय जनता पक्षात गेल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक मोठी हानी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसच्या उर्वरित व एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे. यातून पक्ष संघटनेला सावरण्यासाठी व नव्याने जिल्ह्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यासाठी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली ७ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता धुळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळे शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह धुळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.
धुळे शहर व जिल्हयातील काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती तसेच धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, ग्रामीण व शहर यांची अध्यक्षपदे, जिल्हयातील विविध पदांवर करावयाच्या नेमणुका तसेच येवू घातलेल्या ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा-परिषद, नगर परिषद, महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य निवडणूकां विषयी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय आणि पक्ष वाढ करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने धुळे जिल्हा निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे महासचिव व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता काँग्रेस भवन, टाँवर बगीचा जवळ, धुळे येथे आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आले आहे.
तरी धुळे शहर व जिल्हयातील काँग्रेस कमिटीचे सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन धुळे लोकसभेच्या खासदार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्यासह धुळे जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या सर्व विभागांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.