धुळे जिल्हा
धुळे जिल्या तील सद्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या रास्तभाव दुकानांसाठी परवाना मंजूर करण्यात येणार आहे. इच्छुकांनी नवीन परवान्यासाठी 31 जुलै, 2025 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*रिक्त दुकाने उपलब्ध असलेले ठिकाणे:*
धुळे तालुका: धुळे शहर.
धुळे ग्रामीण:प्रिपी, लोहगड, लोणकुटे, उभंड, नांद्रे, बोरीस.
साक्री तालुका: नागझिरी.
शिरपूर तालुका: दहिवद, शिरपूर.
शिंदखेडा तालुका: वणी, बाभुळदे, मंदाणे
असे जिल्ह्यात एकूण 13 दुकानांसाठी नवीन परवाने देण्यात येणार आहेत. रास्त भाव दुकान ज्या गटास चालविणेस घ्यावयाचे असेल त्यांनी विहीत नमून्यातील अर्ज संबंधित तहसिल कार्यालयाकडून रु. 100/- फॉर्म फी भरुन प्रापत करुन घ्यावेत. विहीत नमून्यातील भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह संबंधित तहसिल कार्यालयाकडेस 31 जुलै, 2025 रोजी सायंकाळी 6.5 वाजेपर्यंत किंवा तत्पुर्वी जमा करावे. विहीत कालावधीत स्वत धान्य दुकानाकरिता सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाईल. ई मेल द्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
नवीन परवान्यासाठी रास्तभाव दुकान मंजुरीसाठीचे नियम, अटी व शर्ती इत्यांदीसह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत गांव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, तालुका नोटीस बोर्ड संबंधीत तहसिल कार्यालय तसेच जिल्ह्याच्या https://dhule.gov.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे.