धुळे कारागृहासाठी १६ कोटी; तर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ४७ कोटींची तरतूद : पालकमंत्री रावल 

मुंबई

धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत राज्य सरकारने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे. धुळे येथील कारागृहाच्या क्षमता वृद्धी साठी १६ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.तर जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून विधिमंडळात पुरवणी मागणी सादर करण्यात आली असल्याची, माहिती राज्याचे पणन, राजशिष्टाचार व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

पालकमंत्री रावल म्हणाले, “धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अद्यावत व नागरी सुविधांमध्ये सक्षम करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय जुन्या इमारतीत कार्यरत आहे. नागरिकांना अद्यावत आधुनिक, सुसज्ज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.”त्यासाठी 47 कोटीची मागणी विधिमंडळातील पुरवणी मागणी मध्ये सादर केले आहे.

धुळे जिल्हा कारागृहा च्या क्षमता वृद्धी आणि सुधारणा करण्यासाठी 16 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. “सध्याच्या कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून,कारागृहाच्या नवीन 100 कैदी क्षमता वृध्दी करणे आणि सुविधा, बंदोबस्त, देखभाल, सांडपाणी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

या पुरवणी मागण्यांमधून धुळे जिल्ह्यातील दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी मिळणार असून, प्रशासन अधिक सक्षम, गतिमान व नागरिकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *