तावखेडा येथील उपकेंद्राचे भूमिपूजन ना. रावल यांच्या हस्ते संपन्न
धुळे जिल्हा
शिंदखेडा तालुक्यातील वीजेची समस्या सोडवण्यासाठी मागील काळात अनेक उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. आता
शिंदखेडा तालुक्यात उर्जा क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक भर घालत एआयआयबी अर्थात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेन्स्टमेंट बँक योजनेअंतर्गत ११४ कोटीतून वीजेचे भक्कम असे जाळे निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
एआयआयबी योजनेअंतर्गत तावखेडा येथील उपकेंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, उपविभागीय अभियंता सदानंद मोथगिरे, जिपचे माजी उपाध्यक्ष भारत ईशी, भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक बागल, मुंबई बाजार समिती संचालक जिजाबराव सोनवणे, दोंडाईचाचे माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, डी एस गिरासे, हर्षवर्धन बागल, तावखेडा चे सरपंच जालीमसिंग गिरासे, मंदानेचे सरपंच सुनील माळी, सहाय्यक अभियंता विकास गायकवाड, सचिन पवार, शैलेश सूर्यवंशी यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री रावल म्हणाले की, एआयआयबी योजनेचा लाभ शिंदखेडा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून शिंदखेडा मतदारसंघात भक्कम वीजेचे जाळे उभारले जाईल तसेच आज भूमीपूजन होत असलेल्या या उपकेंद्रामुळे दाऊल, तावखेडा, वणी, मंदाणे, शेंदवाडे, झोटवाडे, साहूर , टाकरखेडा, चावडदे या गावांना अधिक स्थिर व विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. दीर्घकाळापासून या भागातील नागरिकांना भेडसावत असलेली वीजपुरवठ्याची समस्या या उपकेंद्रामुळे मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री रावल म्हणाले.
*एआयआयबी योजने अंतर्गत शिंदखेडा मतदार संघांत होत असलेली कामे पुढील प्रमाणे*
रामी व बळसाणे उपकेंद्र, चिमठाणा येथे १० एमव्हीए क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर, शिंदखेडा तालुक्यात १० सौर प्रकल्प – एकूण ५२ मेगावॅट क्षमतेचे, विखरण येथे ५ एमव्हीए क्षमतेच्या अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर, सुमारे ६० किमी लांबीच्या ३३ केव्ही लाईनचे काम. तसेच योग्य व स्थिर व्होल्टेज मिळावे यासाठी शिंदखेडा, दळवाडे, विखरण व बामणे या उपकेंद्रांवर कॅपेसिटर बँक बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा अधिक कार्यक्षम व स्थिर होईल ही कामे या योजने अंतर्गत होणार आहेत.
000000