आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते विशेष सत्कार

 

धुळे जिल्हा

आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्यासह मान्यवरांनी केली.

मदनलाल मिश्रा, रविंद्र बेलपाठक आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच शासनस्तरावर त्यांच्या संघर्षांची दखल घेवून सन्मान केल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

केंद्र शासनामार्फत आणीबाणीवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन १९७५ ते १९७७ मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन उद्यापासून माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

या सन्मान सोहळ्यात आणीबाणी काळात कारावास भोगणारे मदनलाल जमनालाल मिश्रा, भिमसिंग रायसिंग राजपूत, माधव जनार्दन बापट, मधुसूदन उर्फे विजय शांताराम पाच्छापुरकर, यादवराव शामराव पाटील (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी, गोपालदास जमनालाल मिश्रा (प्रतिनिधी ), हरसिंग गोरखसिंग जमादार (गिरासे), शशिकांत रनाळकर (प्रतिनिधी), रविंद्र बेलपाठक, रेणुका बेलपाठक, शेखर वसंत चंद्रात्रे (प्रतिनिधी), भास्कर बापट, प्रभाकर भावसार, डॉ.भुपेंद्र शहा, शीला सत्यानारायण अग्रवाल, मंजुळाबाई श्रीपत पाटील, मालती नवनीतलाल शाह, पुष्पा सुभाष शर्मा, प्रविण कृष्णदास शहा, श्रीराम पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकला सोमनाथ जोशी (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक मराठे, शशीकला देविदास शार्दुल, रविंद्र वामन सोनवणे, भिकुबाई शामराव मराठे, डोंगर कन्हैया बागुल, शकुंतलाबाई जूगलकिशोर अग्रवाल यांचा जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या हस्ते सन्मानपत्र, गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *