धुळे जिल्हा
राज्य शासनाकडून पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात सह्यांची मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेला आज पासून धुळे शहरात सुध्दा सुरुवात करण्यात आली. त्याचवेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील हिंदी सक्ती विरोधात जिल्हाधिकार्यांना निवेदन देत निदर्शने केली. धुळ्यात मनसे आणि ठाकरेंची सेना या मुद्दयावर एकत्र आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा लादण्याच्या राज्य शासनाच्या छुप्या निर्णयाला तीव्र विरोध म्हणून राज्यातील सर्व शाळांना उद्देशून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेले पत्रक आज धुळे जिल्ह्यातील बहुतेक शाळांच्या मुख्याधपकांना देवून ’एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात’ हे आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धुळे महानगर प्रमुख संजय सोनवणे (बंटी बाबा) यांच्या नेतृत्वात इंग्रजी माध्यम, मराठी प्राथमिक माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना मनसेच्या शिष्टमंडळाकडून लेखी पत्र देण्यात आले. धुळे मनसे महानगराच्या वतीने ’एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात’ हा उपक्रम राबवण्यात आला.
जनतेने हिंदी सक्तीच्या विरोधात एक सही करण्याचे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात भुषण रोलार, मुषण वाडेर,रविना जोशी, महानगर अध्यक्ष बंटी सोनवणे, सुरज लकर, दक्ष योनो मयुर सोनार, दिनेश कोळी, चेतन तुपे, शिरीष लष्कर, प्रकाश लष्कर, अनिल लष्कर, अभय पवार, गणेश देयकर, हेमंत सोंजे, प्रणव वाघ, सुमित पाटील, संकेत बहोत सोनार, विठ्ठल पगारे, जय सोनार, ओमकार सोनार, वेदांत बोरसे, रोहीत सोनके आदींचा समावेश होता.
शिवसेना उबाठा वतीने निवेदन सादर
प्राथमिक शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्ती नकोच अशी भूमिका घेवून शिवसेनेतर्फे (उबाठा) धुळे जिल्ह्यातील तीन हजार शाळांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.या माध्यमातून राज्य शासनाच्या या निर्णया विरोधात जनांआंदोलन करू असा ईशारा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना लेखी निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, महिला आघाडीचा संगिता जोशी, जयश्री वानखेडे, सोनी सोनार, राजु ढवळे, शिवाजी शिरसाळे, संदीप सूर्यवंशी, कपील लिंगायत, महादु गवळी, सुभाष मराठे,मुन्ना पठाण, पंकज भारस्कर, पीनु सुर्यवंशी, अजय चौधरी, विष्णू जावडेकर, सागर निकम, सागर साळवे, ईशतियाक अंसारी , योगेश पाटील,सचिन रुंणवाल, आशुतोष कोळी आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकातून देण्यात आली आहे.
—————