धुळे जिल्हा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून रोजी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून समाजकल्याण विभागामार्फत समता दिंडी / प्रभात फेरी तसेच समता रथाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सामाजिक समतेचा संदेश देणारी समता दिंडी गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 9-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथून सुरुवात होणार आहे. ही दिंडी पुढीलप्रमाणे मार्गक्रमण करणार आहे.
प्रशासकीय संकुल – जिजामाता हायस्कूल – झाशी राणी पुतळा – जुनी महानगरपालिका – महाराणा प्रताप पुतळा – फुलवाला चौक – महात्मा गांधी पुतळा – नगरपट्टी (पाटबाजार) – गल्ली नं. ४ (बँक ऑफ महाराष्ट्र) – खोलगल्ली – सीमा हँडलुम – पारोळा रोड – कराचीवाला खुंट – जुनी महानगरपालिका – नवीन महानगरपालिका – कमलाबाई हायस्कूल चौक – जुने सिव्हिल हॉस्पिटल – संतोषीमाता मंदिराजवळील गुलमोहर विश्रामगृह – धुळे आवार येथे समारोप करण्यात येईल.
या समता रॅलीमध्ये सर्व नागरिकांनी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. सैदाणे यांनी केले आहे.
000000