धुळे शहर
धुळे येथील राहुल भोई यांच्यावर हिप जॉइंट शस्रक्रिया आवश्यक होती. मात्र, तेवढी आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी आमदार अनुप अग्रवाल व एबी फाउंडेशनकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार अग्रवाल व एबी फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे पाठपुरावा करत भोई यांना एक लाखाचा निधी मिळवून दिला. निधी मंजुरीचे पत्र नुकतेच आमदार अग्रवाल यांच्या हस्ते रुग्ण भोई यांना प्रदान करण्यात आले.
धुळे येथील रुग्ण राहुल गोपीनाथ भोई यांच्यावर हिप जॉइंट शस्रक्रिया आवश्यक होती. त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. याबाबत त्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतीची विनंती केली. आमदार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार एबी फउंडेशनने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे भोई यांचा अर्ज, आवश्यक कागदपत्रे देत ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे ऑनलाइन पाठविण्यात आली. यानंतर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठपुरावा करत निधी मंजुरीची विनंती केली. त्यानुसार राहुल भोई यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांच्या शस्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. निधी मंजुरीचे पत्र नुकतेच आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते राहुल भोई यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रुग्ण राहुल भोई व त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अग्रवाल, मुख्यमंत्री सचिवालयाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, राज्याचे वैद्यकीय समन्वयक (वर्ग 1) डॉ. स्वानंद सोनार, राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. मनोज विसपुते यांचे आभार मानले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, प्रमोद बागूल, कपिल पिवाल, एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे यांनी निधी प्राप्तीसाठी सहकार्य केले.