निर्मानाधिन भाजप कार्यालयात स्व. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त प्रतिमा पुजन व अभिवादन
धुळे शहर
– दि. २३ जुन २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी, धुळे महानगर निर्मानाधिन कार्यालयात स्व. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनाचे अवचित्य साधुन प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यालय परिसरात भाजपा कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
दो निशान दो विधान व दो प्रधान नही चलेंगे ही घोषणा देणारे जनसंघाचे संस्थापक स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांचे कार्य हे प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. कश्मीर मध्ये लावलेले ३७० कलम रद्द करण्याकरीता ज्यांनी बलिदान दिले त्या डॉ. शामाप्रसादजींना सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या भाजपा सरकारने ३७० हे जाचक कलम रद्द करून काश्मिरला मुक्त केले. व तेथे लोकशाहीचे राज्य निर्माण केले. त्यांना हीच खरी श्रध्दांजली ठरली आहे. असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर यांनी केले.
स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानदिना निमीत्त भाजपा धुळे महानगरातर्फे निर्मानाधिन जिल्हा कार्यालयात मा. जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व मा. आमदार अनुप भैय्या अगवाल यांच्या मार्गदर्शनात श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रदेश चिटणीस डॉ. सुशिल महाजन, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, भारतीताई माळी, माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडे, अनिल दिक्षित, भगवान देवरे, राजेंद्र खंडेलवाल, प्रदेश पदाधिकारी सुरेश बहाळकर, मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, अमोल मासुळे, ज्ञानेश्वर पाटील, शरद चौधरी, शिवाजीराव काकडे, कमलाकर नाना पाटील, विकास पाटील, विलास पाटील, रवींद्र पाटील, भिकन पाटील, पालखे सर, शरद बिरारी, सुभाष पाटील, संतोष लकडे, तुषार भागवत, भागवत चितळकर, शेखर कुलकर्णी, सुनिल कोठावदे, बिपीन रोकडे, हिरालाल मोरे, सुनिल कपील, वंदना भामरे, मोहिणी धात्रक, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील, सोशल मिडीया प्रमुख पवन जाजू, निलेश राजपुत, कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे, युवा नेते सुहास अंपळकर, योगेश वाणी, सुशिल वर्मा, माजी मंडल अध्यक्ष ईश्वर पाटील, प्रशांत बागुल, ऍड. गोपाल चौधरी, दगडु बागुल, सुरज चौधरी, राजेश पवार, अरुण दुसाणे, आदींसह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.