धुळे जिल्हा
– जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये . 21 रोजी योग संगम व हरित योग उपक्रम राबविण्यात आला. यावेळी स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश पाटील यांनी दिलेल्या सूचना नुसार सदर उपक्रम घेण्यात आले. त्यात शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले. योग् प्रात्यक्षिके करीत ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक यांनी योग साधना केली. अनेक ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री गणेश चौधरी, साक्री पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री शशिकांत सोनवणे, शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रदीप पवार, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभारी श्री रमेश नेतनराव यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.