धुळे जिल्हा
धुळे येथे झालेल्या मॉडेलिंग स्पर्धेत शहादा येथील दर्शन विक्रांत धोबी हा ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र विजेता ठरला आहे.
द गेम चेंजर प्रोडक्शन हाऊसकडून फाउंडर अनिकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात धुळे येथे मॉडलिंग प्रेझेंट शो घेण्यात आला. या कार्यक्रमात शरद उगले आणि गायत्री ठाकूर जज होते. त्यांनी ग्लेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र – 2025 मिस्टर ग्रुपचा विजेता कंटेस्टंट नंबर 40 दर्शन विक्रांत धोबी याची निवड केली.
तो शहादा येथील शिरूर चौफुली येथील प्रकाश नगरातील रहिवासी विक्रांत धोबी यांचा मुलगा आहे. दर्शन धोबी हा दहावी पर्यंत व्हॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा येथे शिक्षण घेतले. दहावी मध्ये 75 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.त्या नंतरकै. सौ. जी. एफ. पाटील कॉलेज मध्ये १२ वी परीक्षेत 65 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाला. दर्शन धोबी हा ५ वर्षा पासून मॉडेलिंग मध्ये मेहनत घेत आहे. मॉडेलिंग क्लास न लावता राहत्या घराच्या टेरेसवर रॅम्प वॉक करायचा. त्याने मॉडेलिंग शो अनेक ठिकाणी सहभाग घेतलेला आहे.त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. लहानपणा पासून मॉडेलिंगची आवड आहे. दर्शनला एक चांगला अभिनेता किंवा एक चांगला मॉडेल बनायचं आहे. दर्शन हा सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे. दर्शन याचे वडील विक्रांत धोबी हे शहादा येथे रिक्षा चालक आहेत. आई मीरा धोबी काम सांभाळून दोघा मुलांना शिकवण्याची धडपड करते. त्याची बहीण काजल ही इलेक्ट्रिकल डिप्लोमा धारक असून पुढे उच्च शिक्षण घेणार आहे. दर्शन यास कॉम्प्युटर शिक्षण करायची इच्छा आहे. दर्शन हा मॉडेलिंग स्पोर्ट्स सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे आई – वडिलांनी सांगितले. भविष्यात अभिनेता होण्याची इच्छा असून भविष्यात नक्कीच चांगला अभिनेता बनू शकतो आणि एक चांगला मॉडेल ही बनू शकतो असा विश्वास त्याने बोलून दाखविला.दर्शन हा शिक्षण सोबत पार्ट टाइम जॉब ही करतो. दर्शन याने मॉडेलिंग स्पर्धेत यश संपादन केल्याने त्याचे शहादा शहरातील परीट समाज,शिक्षक,मित्र परिवाराने अभिनंदन करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.