धुळे जिल्हा
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यावतीने सोमवार, 23 जून 2025 रोजी ‘ऑलिम्पिक डे’ निमित्ताने विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापना दिवस (23 जून) चे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
*प्रशिक्षण वर्ग पुढीलप्रमाणे:*
बास्केटबॉल खेळ प्रशिक्षण वर्ग – सकाळी 7.00 वाजता
स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धुळे
संपर्क: मुद्रा अग्रवाल – 7499636154
रायफल शूटिंग खेळ प्रशिक्षण खेळ – सकाळी 10.00 वाजता
स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धुळे
संपर्क: कपिल बागुल – 9922522865
बॅडमिंटन खेळ प्रशिक्षण वर्ग – संध्याकाळी 4.00 वाजता
स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धुळे
संपर्क: शरतान चौधरी – 9623864930
योगासन प्रशिक्षण वर्ग– संध्याकाळी 6.00 वाजता
स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धुळे
संपर्क: योगेश्वरी मिस्तरी – 7507324814
खो-खो खेळ प्रशिक्षण वर्ग – संध्याकाळी 6.00 वाजता
स्थळ: गरुड मैदान, धुळे
संपर्क: श्वेता गवळी – 9765097688
तरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी व क्रीडाप्रेमींनी या प्रशिक्षण वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.टिळे यांनी केले आहे.