धुळे जिल्हा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी लाभ वाटप करण्यात येत आहे. साक्री तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, उमरपाटा येथे लाभ वाटप शिबिर मोठया उत्साहात संपन्न झाला.
या शिबिरास अपर तहसिलदार दत्ता शेजुळ, गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहायक प्रकल्प अधिकारी मनोज पाटील तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी व परिसरातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या अभियानातंर्गत लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना निवड प्रमाणपत्र, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, रेशन कार्ड, घरकुल मंजुरी प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. तसेच विविध योजना आणि लाभांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना कृषी विभाग, महिला बालविकास प्रकल्प, जलजीवन मिशन योजना तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.
अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र घटकांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातंर्गत जिल्ह्यात आयोजित ठिकाणी शिबिरात सहभाग नोंदवून शासकीय सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. असे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.