धुळे जिल्हा
यंदा पाऊस लांबल्याने गौभक्त शेतकरी व गौशाळांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत असते. यामुळे गौमाता व पशुपालकांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेवून श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जुनमध्ये गरजवंत शेतकरी व गौशाळांना शेकडो टन चारा वाटप केला जातो. त्यानुसार यंदाही श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे गौभक्त शेतकरी व गौशाळांना चारा वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गायी आहेत व खरोखर चाऱ्यांची निकड आहे अशा शेतकऱ्यांनी तसेच गरजवंत गोशाळांनी चाऱ्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा परमगौभक्त रविंद्रबापूजी शेलार यांनी केले आहे. तसेच गौसेवेचा देखावा करणाऱ्या खोटारड्या लोकांनी कृपा करुन संपर्क साधू नये, असे कळकळीचे आवाहनही रविंद्रबापूजी शेलार यांनी केले आहे.
श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे गौसेवेसाठी तसेच गौहत्या थांबविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, बन्याचदा चारा टंचाईमुळे पशुपालक गार्गीना विकण्याचा विचार करतात, जुन महिन्यात पाऊस लांबल्यास चारा टंचाईचा प्रश्न शेतकरी व गौशाळांपुढे निर्माण होते, त्यामुळे श्री द्वारकाधीश प्रतिष्वानच्या माध्यमातून दरवर्षी जुन महिन्यात गौमाता व गौताळांना चारा वाटप केला जातो. तसेच गौमातांची तहान भागविण्यासाठी ‘चौक तेथे गौहौदा’ ही स्तुत्य संकल्पनाही राबविण्यात येते. जेणेकरून माधींना ठिकठिकाणी पिण्याचे शुद्ध व ठंड पाणी मिळावे, जिथे जिथे गौमाता आराम करते, सावलीत धांबते, त्या-त्या ठिकाणी मागेल त्याला गौहौदा देण्याचे काम श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान करत असते. त्याचप्रमाणे ‘घर तेथे गौशाळा’ ही संकल्पना गेल्या २१ वर्षापासून राबविली जात आहे. कारण केवळ ‘जय गौमाता’ बोलून किंवा मोठे मोठे आंदोलन करून गौहत्या थांबणार नाही, असे रविंद्रबापूजी शेलार असा ठाम विश्वास रविंद्रबापूजींनी व्यक्त केला आहे.
जापल्या सभोवताली गौमातांची होणारी कत्तल ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. त्यामुळे गौहत्या धांबवण्यासाठी प्रायेकाने गौसेवा करणे गरजेचे आहे. आपन गौसेवा करणे बंद केले आहे म्हणून आपल्या गौमाता, आपले गौवंस बाजारात जावू लागले आहेत आणि त्यांचा मोल भाव होऊ लागला आहे. जी गौमाता लक्ष्मीच्या रुपात अंगणात असायला हवी, ती गौमाता आज या हिंदुस्थानातल्या ७० टक्के लोकांच्या ताटात आहार म्हणून, जेवण म्हणून वाढण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवी असे नशिब गौमाता घेवून आलेली आहे असे वाटते, अशी खंतही बापूजी व्यक्त करतात.
चाऱ्यासाठी शेतकरी व गौशाळांनी संपर्क साधावा !
श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे यंदा सुमारे ५०० टन चारा वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गौपालकास एक दिवसाआड १ टन चारा वाटप केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गायी आहेत असे शेतकरी व गौशाळांनी चाऱ्यासाठी मो.नं. ९३७३५०२५४८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा परमगौभक्त रविंद्रबापूजी शेलार यांनी केले आहे.
लबाडांनी दूरच रहावे !
श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे गोवंश, चारा व गौहादा चे वाटप केले जाते. मात्र, हे दान करत असताना समोरील व्यक्त खरोखर पात्र आहे का, याची बारकाईने तपासणी केली जाते. त्यामुळे कृपा करून कोणीही खोटे कागदपत्र किंवा खोट्या ओळखी दाखवून गौवंश, चारा किंवा गौहौदा मागू नये. कारण गौहौदा वाटप केल्यानंतर बरेचजण त्याचा कचराकुंडी म्हणून वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गौसेवेचा देखावा करणाऱ्या खोटारडे व फसव्या लोकांनी कृपा करून आमच्याशी संपर्क साधू नये, असे विनम्र आवाहनही रविंद्रबापुजी शेलार यांनी केले आहे.