धुळे जिल्हा
भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी सरपंच तथा भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिरपुर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनिल पावरा यांचाशी रुग्णालयातील विविध समस्यांवर चर्चा केली व माहिती जाणुन घेतली.
शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात एमडी, एमएस सर्जन, सीटी स्कॅन विभाग आदिंची माहिती जाणुन घेतली, रुग्णालयात स्वतःची ब्लड बँक असणे, रुग्णांसाठी स्वच्छ व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रुग्णालयातील कर्मचारी व इतर महिलांसाठी शौचालय बांधणे असणे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आल्यात. धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्काळीन माजी आरोग्यमंत्री डाॅ. दिपक सावंत व माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचाकडे शिरपुर रुग्णालयात एॅक्सरे व सीटी स्कॅन मशिन मिळण्यासाठी आपण विशेष पाठपुरावा केला होता. व रुग्णालयात एॅक्सरे व सीटी स्कॅन मशिन आल्याने धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी आनंद झाला असल्याचे सांगितले.
यावेळी रुग्णालयातील सीटी स्कॅन विभागातील विशेष माहिती जाणुन घेतली असुन शिरपुर उपजिल्हा रुग्णालय शासकीय रूग्णांसाठी मोफत तसेच प्रायव्हेट रुग्णांसाठी शासकीय दरात सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन दिले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सीटी स्कॅन विभागाचे अक्षय भूते, प्रतिक म्हसे, ईश्वर सैंदाणे, नितीन, निलेश, प्रशांत भूपेंद्र, मितांशी सिस्टर आदि उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी सरपंच तथा भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे या पदाधिकाऱ्यांचा सीटी स्कॅन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्वागत, सत्कार केला.