धुळे शहर
विदेशी बनावटीच्या दारूचा अवैध साठा वाहून नेणारा एक ट्रक आज नगाव जवळ महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. यावेळी दोघांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ट्रकची तपासणी केली जात होती. अशातच सोलापूरहून येणारा एमएच १३ डीक्यू ९६६५ क्रमांकाचा ट्रक अडविण्यात आला. ट्रकमध्ये काय आहे याची विचारणा चालकाकडे केली. – त्यांच्याकडून उडवा उडवीची – उत्तरे मिळाल्याने चालक, – सहचालक यांना ताब्यात घेण्यात – आले. ट्रकची तपासणी केली असता त्यात लपवून ठेवलेला – विदेशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आला.
पकडलेला दारूसाठा हा लाखो रुपये किंमतीचा आहे. ट्रकसह दारू असा लाखोंचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. हा सर्व साठा सोलापूर येथून आणण्यात आला असून तो धुळे मार्गे गुजरातच्या दिशेने नेला जात होता असे चालकाच्या चौकशीतून समोर आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकातील पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील यांनी कारवाई केली.