नाशिक
एकीकडे राज्यभर शाळा सुरू होत, शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असतांना नाशिक शहरातील शेकडो विद्यार्थ्यांसह 200 ते 300 पालक यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांची शाळा भरवली.
हे आंदोलन सोयगाव, मालेगाव शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निवास्थानाच्या बाहेर झाले आहे आज दिनांक 16 जून रोजी करण्यात आले.
मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक च्या अभिनव बाल विकास मंदीर, जनता विद्यालय, व आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक, या तीनही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या संदर्भात पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून शासनाला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना व शिक्षणमंत्री यांना शेकडो निवेदन दिले आहेत परंतु अद्याप पर्यंत शिक्षण विभागांनी या निवेदनाची दाखल घेतली नाही तसेच आमच्या मुलांना शाळेने प्रवेशापासून वंचित ठेवले आहे म्हणून आज शेकडो विद्यार्थ्यांसह 200 ते 300 पालक शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन पालकांना आश्वासित केले आहे की आम्ही उद्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून चौकशी समिती नेमून तुम्हाला त्वरित न्याय दिला जाईल तुम्ही कृपया आजचे आंदोलन स्थगित करावे व उद्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जाईल असेही आश्वासित केले म्हणून तात्पुरता पालकांनी आजचे आंदोलन स्थगित केले आहे.
निवेदनासोबत पालकांच्या 14 मुख्य मागण्या दिलेल्या आहेत त्या निवेदनात सविस्तर आहेत. येत्या आठ दिवसात पालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व पालक मुलांसह शाळेच्या बाहेर खूप उपोषणास बसतील. अशी माहिती पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, किरण गायकवाड, पुष्पेन्द्र महाजन, संदीप गांगुर्डे, सचिन देवरे, संगीता पाटील वैशाली सूर्यवंशी व संघर्ष समितीच्या पालकांनी दिले आहे