धुळे जिल्हा
सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढ झाली असल्याने, पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रात्री सुलवाडे बॅरेज मधुन विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
आज दिनांक 16 रोजी सुलवाडे मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढ आहे, पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील 2 ते 3 तासात *सुलवाडे बॅरेज* मधुन विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांना सूचना देऊन तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे करिता कळविण्यात यावे असे आवाहन उपविभागीय अभियंता
पाटबंधारे उपविभाग क्र. १ साक्री यांनी केले आहे.