विखरण येथे वरिष्ठ अधिकारी आले विद्यार्थ्यांच्या स्वागताला !

विखरण येथे वरिष्ठ अधिकारी आले विद्यार्थ्यांच्या स्वागताला !

शाळेचा पहिला दिवस; अनोख्या स्वागताने विद्यार्थी भारावले

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विखरण येथे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी “१०० शाळा भेट” या उपक्रमांतर्गत गटविकास अधिकारी प्रदीप पवार, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) प्रमोद पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले. शाळेत झालेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते.


सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी पूर्ण राज्यामध्ये “शाळा शुभारंभ होत आहे” त्या निमित्ताने “१०० शाळा भेट” या उपक्रमांतर्गत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा, विखरण येथे शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीपजी पवार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी “शाळा शुभारंभ व शाळा प्रवेशोत्सव” कार्यक्रमसाठी सकाळी ७. ०० वा भेट दिली. शाळेने कशाप्रकारे नियोजन केले आहे ती माहिती मुख्याध्यापक यांच्याकडून जाणून घेतली!

त्यानंतर शाळेत दाखल होणाऱ्या 51 विद्यार्थ्यांची घोडागाडी (बग्गी) वर बसून गावात संवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दाखल पात्र विद्यार्थ्यांचे शाळेतले पहिले पाऊल ठसा उमटून प्रत्येक पालकाकडे देण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, गणवेश, बूटमोजे, अधिकारी पदाधिकारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. शाळेत झालेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते.

या प्रसंगी गावातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते सचिन वसंतराव पाटील, किशोर पाटील, हेमराज पाटील, तुषार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ देवीदास भिल, सर्व पदाधिकारी , शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गट विकास अधिकारी श्री पवार यांनी “विखरण” शाळा दत्तक घेतली असून शाळेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
श्री प्रमोद पाटील, उप शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विखरण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *