राष्ट्रीय मुस्लीम मोर्चातर्फे धुळ्यात निदर्शने वक्फ कायद्यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर

धुळे जिल्हा

मुस्लीमांच्या धार्मिक स्थळास निवासी वसाहती, बाजारपेठेतील दुकानें आणि अन्य मालमत्ता बुलडोझर लावून पाडण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे,असा आरोप राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी आज जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले.

शिष्ठमंडळात जिल्हाध्यक्ष ऍड.इम्रान शेख, डॉ. मीनहाज काझी, हाफीज बेग रशीद बेग,शेख हुसेन सलीम,प्रा.महादेव जमदाडे, आनंद बाबुराव शिंदे,शेख आशिक शेख जुम्मा खाटीक आणि राजेंद्र शामराव बैसाणे यांचा समावेश होता.

यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनातील मागण्या अशा-अलीकडे झालेल्या हत्यांना दोषी असलेल्यांविरुद्ध जलद न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या हत्याकांडात ज्यांनी जीव गमावला आहे, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये व त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्यांना नोकरी द्यावी, अपराध्यांना संरक्षण आणि सर्वार्थाने सुरक्षा पुरवणार्‍या विरुद्ध ही कारवाई करण्यात यावी, पद्धतीने कार्यवाही करून बेघर करण्यात आलेल्या कुटुंबियांसाठी निवासस्थाने निर्माण करावीत आणि त्यांचे पुनर्वसन करावे,असंवैधानिक पद्धतीने विस्थापित केलेल्या कुटुंबीयांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक आणि पोटी प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, इस्लाम धर्माशीसंबंधित पूर्वपार चालत आलेल्या रुढी परंपरा व संस्कारांच्या दृष्टीने निर्माण केलेल्या दास्तावेज, वास्तूंवरील टीका टिप्पणी बंद करावी व अशी निराधार टीका करणार्‍यांसाठी कठोर कायदे करण्यात यावे. धर्माच्या नावावर मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कम्यूनल वायलस प्रिवेंशन एक्ट वर आधारित कायदा बनवावा व त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी, वक्फ संसोधन विधेयक 2025 संविधानचा मुळ मसुदा दृष्टीक्षेपात ठेवून या संदर्भात करण्यात आलेल्या विधेयकातील दुरुस्तीवरील आक्षेप लक्षात घेतात ती रद्द करण्यात यावी. अशा अनेक मागण्यांचा समावेश या निवेदनातून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *