धुळे जिल्हा
धुळे येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापती पदी यशवंत दामू खैरनार तर उपसभापती पदावर नानासाहेब देवराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. बाजर समितीचे मावळते चेअरमन बाजीराव पाटील आणि व्हा. चेअरमन योगेश पाटील यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला यामुळे आज ही निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी यांनी काम पाहिजेत नवनीत गोसावी, अमोल एंडाईत, मार्केट कमिटीचे सचिव देवेंद्र पाटील, सहसचिव विशाल आव्हाड यांनी त्यांना सहकार्य केले. अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन यशवंत खैरनार म्हणाले की, माजी चेअरमन बाजीराव पाटील यांची दोन वर्षाची कारकिर्द संपल्याने ही विडणूक घेण्यात आली. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. आजवर बाजार समितीत ज्या पद्धतीने कामकाज चालले तसेच पुढेही चालू राहील, मार्केट कमिटीतील सर्व संचालक मंडळ, हमाल मापाडी, व्यापारी व शेतकरी या सर्वांशी समन्वय साधून चांगलात चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. मा.आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार सिमतीच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वोतोपरी पयत्न केला जाईल. या माध्यमातून जवाहर गटाची ताकद वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. वयाच्या 70 व्या वर्षी आपण ही शेवटची निवडणूक लढवित आहोत. उर्वरित आयुष्य आपण माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यतीत करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी पंढरीनाथ साळुंखे, भगवान गर्दे, बापू खैरनार, भटू चौधरी, प्रदिप खैरनार, सोमनाथ पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. संदीप पाटील, हिरामण पाटील, भगवान दुग्गड, माधवराव पाटील, रामकृष्ण पाटील, गोरख पाटील, चुडामण पाटील, साहेबराव पाटील, विनोद बच्छाव जिभाऊ बोरसे व अनिल देसले आदी मान्यवर उपस्थित होते.