ई- केवायसीची टाळाटाळ भोवणार; दि. ३० जूनपर्यंत मुदत -शिरपुर पुरवठा निरिक्षण अधिकारी दिनेश ठाकरे
धुळे जिल्हा
शिरपुर राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान शिरपुर तालुक्यात 86 हजार 178 शिधापत्रिका धारकांची ई- केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. या शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर ई- केवायसी करणे गरजेचे आहे असे आवाहान शिरपुर पुरवठा निरिक्षण अधिकारी दिनेश ठाकरे यांनी केले आहे. तसे न केल्यास दि. ३० जूननंतर त्यांचे धान्य बंद होईल असा इशारा पुरवठा विभागाने दिला असल्याची माहिती अरुण धोबी यांनी दिली.
शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिका धारकांना ई- केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत ई- केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. मात्र मुदत संपल्या नंतर ही राज्यातील अनेक शिधा पत्रिका धारकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासना कडून ई- केवायसीसाठी दि. ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. असे शिरपुर पुरवठा निरिक्षण अधिकारी दिनेश ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान ज्या शिधापत्रिका धारकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्यांनी दि. ३० जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
शिरपुर तालुक्यात एकूण 3 लाख 18 हजार 270 शिधापत्रिका धारकांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागासमोर लक्ष्य होते. त्यापैकी 86 हजार 178 शिधापत्रिका धारकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी आहे. तालुक्यात एकूण 70 टक्के शिधापत्रिका धारकांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्या दि. ३० एप्रिल पर्यंत ई- केवायसी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीनंतर ही अनेकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी होती. नवीन शिधापत्रिका धारकांची वाढ झाल्याने त्यांची देखील ई- केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. असे शिरपुर पुरवठा निरिक्षण अधिकारी दिनेश ठाकरे यांनी सांगितले.