अहमदाबाद विमान दुर्घटनेने देश हादरला 241 जणांचा मृत्यू तर एक जण वाचला

अहमदाबाद

गुजरातच्या अहमदाबाद मध्ये देशाला हादरून टाकणारा विमान दुर्घटना घडली आहे. यात 241 जण मारले गेले असून फक्त 1 जण बचावला, असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा  यांनी दिली आहे.
230 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे  विमान लंडनला जात होते. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून हे विमान निघाले होते.

अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमानात २30 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले. स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल, पोलीस, आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विमानातील जवळपास सर्व जण मरण पावल्याचे म्हटले जात आहे मात्र मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून, विमान कोसळण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.


मृतांच्या कुटुंबांना टाटा समुहातर्फे
प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर
अहमदाबाद इथं झालेल्या भीषण विमान  अपघात दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समुहानं प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्चही समूह उचलणार असून बीजे महाविद्यालयाचं वसतीगृह देखील बांधून देणार आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *