‘गुलमोहर कॅश’ प्रकरणात तिसरा अज्ञात आरोपी धुळे पोलिसांच्या हाती..! किशोर पाटीलसह पनवेलच्या गौतम वाघमारेला चौकशीसाठी घेतले ताब्यात !!
धुळे शहर
धुळ्याच्या ‘गुलमोहर कॅश’ प्रकरणात निष्पन्न केलेला तिसरा अज्ञात आरोपीचा छडा लावत धुळे पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. गौतम नारायण वाघमारे (वय ४३) सध्या राहणारा पनवेल , मूळ गाव मुखेड नांदेड असे त्याचे नाव गाव असून या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील याला सुद्धा आज धुळ्यात आणले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्राम गृह येथील १०२ क्रमांकाच्या कक्षात एक कोटी ८४ लाख रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांच्या आंदोनानंतर हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी जमा केली असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच समिती अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पाटील यांचे निलंबनही करण्यात आले आहे. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले असून मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.
धुळे पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीवी मधे दिसलेले लोकं नेमकी कोणकोण आहेत , दिसलेल्या गाड्या कोणाच्या आहेत आणि ही लोकं गुलमोहर येथे का आली होती? या बाबत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीयांना सीसीटीवी दाखवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या लोकांना सुद्धा आइडेंटिफाई करून त्यांना पण तपासात बोलावण्यात येणार आहे. आरोपीचे सीडीआर प्राप्त करण्यात आले असल्याची माहिती ही पोलिसांकडून प्राप्त होत आहे.