धुळे जिल्ह्यात गो हत्या टाळण्यासाठी पोलिसांनी राबवला विशेष कृति आराखडा

धुळे जिल्ह्यात गो हत्या टाळण्यासाठी पोलिसांनी राबवला विशेष कृति आराखडा ; चोख कायदा सुव्यवस्थेवर भर

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात या वर्षी कुठेही गो हत्या होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थे आबाधित ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना केल्याचा दावा करण्यात आला आहे.

बकरी ईद हा सण उत्साहात पण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांच्या अधीपत्याखालील यंत्रणेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाय योजना यंदा धुळे जिल्ह्यात केल्या.

गुरांची खरेदी-विक्री आठवडा भर बंद

या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,की पहिल्यांदाच जिल्ह्यातील धुळे, शिरपूर आणि  साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमधे एक आठवडा जनावरांची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली. सर्व गावांमध्ये यंदा पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली आणि त्यांना गो हत्या बाबत जागरुक करण्यात आले. सर्व मुस्लिम धर्मियांच्या पोलीस ठाणे हद्दीत तसेच उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर बैठका घेण्यात आल्या.त्यांना गोहत्या कायद्या बाबत ठळकपणे जाणीव करून देण्यात आली.

जिल्ह्यात गो हत्या होऊ नये यासाठी गेल्या १० दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी १४ चेक नाके कार्यान्वित करण्यात आले. धुळे महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्याही यानिमित्त पोलिसांनी  बैठका घेतल्या.

टाकाऊ पदार्थ वाहून नेण्यासाठी सर्व ट्रॅक्टरवर काळे मेनकापड असावे, ट्रॅकेटर्सची संख्या जास्त ठेवावी, ड्रायव्हर ला सांगण्यात आले,की त्यांनी न रेंगाळता फ़ास्ट मूवमेंट करावी, पाण्याचे टँकर्स ठराविक भागात जास्त ठेवावे आदी सूचना यावेळी करण्यात आल्या. मागील सर्व गो वाहतूक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाही करण्यात आल्या.पहिल्यांदाच गोवाहतूक गुन्हेगारांना तडीपार आणि धुळे शहरात एंट्री बंद करण्यात आल्या असून संवेदनशील भागात तीन दिवस आधीच बॅरिकेडिंग करण्यात आले जेणे करून गो वाहतूक होणार नाही. संवेदनशील भागात बेमालुमपणे होणारी गो तस्करी टाळण्यासाठी म्हणून ड्रोन चा वापर करण्यात आला.

सोशल मीडियावर विशेष लक्ष

सोशल मीडिया सेल मार्फत तत्काळ अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाही करण्यात आली असून गोरक्षक वा कोणाकडूनही इन्पुट मिळाला तरी पोलिसांनी तत्काळ जाऊन खात्री करून कारवाही केली आहे. खासगी लोकांकडून ड्रोन चा वापर करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ड्रोन वर बंदी घालण्यात आली. पशू वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांच्या बैठक पोलिसांनी घेतल्या.सीआरपीएफ रैपिड एक्शन फ़ोर्स, एसआरपीएफ कंपनी, होमगॉर्डस्, आरसीपी, स्ट्राइकिंग फोर्स यांचा प्रभावी वापर करण्यात आला.सर्व नॉन एग्जीक्यूटिव ब्रँचेस उदा डीएसबी, एलसीबी, कंट्रोल , वेलफेयर,साइबर ,रिडर ब्रांच या सर्वांना बंदोबस्त मधे घेण्यात आले.या वेळीस आधीच मा डीजी कडून २ दिवस सर्व पोलिसांच्या सुट्टी बंद करून घेण्यात आल्या.

पोलिसांचा १० दिवसांपासून रूट मार्च

कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्व घंटा गाड्यांबरोबर एक पोलिस बाइक वर देण्यात आला होता.कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गुड मॉर्निंग स्क्वाड हा सतत ७ दिवस सर्व धार्मिक स्थळ, पुतळे यांची पहाटे ४ ला पाहणी करत होता.या वेळी १० दिवसांपासून रूट मार्च चे नियोजन करण्यात आले होते . आणि शेवटचा रूट मार्च धुळे शहरात घेऊन त्यात मा जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पूरवेळ सहभाग घेतला अशी माहिती यावेळी देण्यात आली.या वेळी ४ दिवस अगोदर पासून सायंकाळी ६ ते पर्यंत प्रभारी पायी पेट्रोलिंग ठेवण्यात आली. शहरा व्यतिरिक्त संवेदनशील गावात देखील पायी पेट्रोलिंग करण्यात आली.सर्व धार्मिक स्थळ, पुतळे यांचा बीडीडीएस आणि डॉग स्क्वाड मार्फत चेकिंग करण्यात आले.

” झिरो टॉलरेंस पॉलिसी “

या वर्षी पोलिसांच्या कुर्बानी करणाऱ्या कसाई /खाटिक लोकांच्या देखील बैठका घेतल्या जेणे करून गोहत्या होणार नाही. या वर्षी पोलिसांनी “ झिरो टॉलरेंस पॉलिसी “टारगेट ठेवत २०२५ मधे आज पावतो ७२ गोवंश संदर्भात केसेस केलेल्या आहेत आणि यात ११५ आरोपींना अटक केली आहे अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *