धुळे जिल्ह्यातील 12 गोतस्कर हद्दपार ; बकरी ईदच्या आधी पोलिस अधीक्षकांची कारवाई

धुळे जिल्हा

बकरी ईदच्या आधी धुळे शहर आणि जिल्ह्यात पहिल्यांदाच गोतस्करांना हद्दपार करण्यात आले. एसपी श्रीकांत धिवरे यांनी १२ गोतस्करांवर कारवाई केली आहे. दोन दिवसांपुर्वीच आ. अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे अवैध कत्तलखाने आणि गोवंश तस्करीचा विषय मांडत कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या कडे केली होती. याचे परिणाम आज दिसून आले.

शिरपूर येथील टोळी वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार

जाहीर हुसैन अब्दुल माजिद तेली (५१) रा. आदर्श नगर, शिरपूर, बल्लू मजीद तेली (३४), रा. आदर्श नगर, शिरपूर, इमरान खान अय्युब खान (३५), रा. कब्रस्तानजवळ, शिरपूर व शाहरूख शरीफ तेली (२४), रा. लोहार गल्ली, दत्त टॉकीजजवळ, शिरपूर यांना एक वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही टोळी गो तस्करीच्या धंद्यात गुंतलेली आहे. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल आहेत. बकरी ईदला या टोळीमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळण्याची शक्यता होती. तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, गोवंशाचे रक्षण व्हावे म्हणून एसपी धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये या चौघांना तडीपार केले आहे. हद्दपारीच्या काळात ही टोळी यंत्रणेच्या परवानगीशिवाय जिल्ह्यात दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल; तसा इशाराही देण्यात आला आहे.

आठ जणांना चार दिवसांसाठी धुळे शहरात प्रवेश बंदी

गोवंश कायद्याचा भंग करून वारंवार गुरांच्या तस्करीत नाव आलेल्या आठ जणांना चार दिवसांसाठी एसपींनी शहरातून हद्दपार केले. आहे. यामध्ये मोहम्मद कलीम मुक्तार अहमद कुरेशी (वय २६ रा. सिराज पहेलवानची गल्ली, मौलवीगंज धुळ) सलमान अब्दुल मन्नान अन्सारी (वय ४० रा. तल्हा मशिदीजवळ, फिरदोस नगर, धुळे) जाकीर हुसैन महेमुद अन्सारी ऊर्फ जाकीर काल्या (वय ३९ रा. ग न. १४, जाकीर डॉक्टरचे दवाखाना नाल्या किनारी, धुळे) शेख जावेद शेख अजीज (वय ४४ रा. कुबा मशिदीजवळ आशियाना नगर, धुळे) मोहम्मद शाबान अब्दुल हक्क अन्सारी (वय ४३ वर्ष रा. नंदीरोड, रातराणी हॉटेल जवळ फिरदोस नगर, धुळे) नियाज अहमद अब्दुल रशिद अन्सारी (वय ५० रा.ग न १४, मक्का मशिद जवळ माधवपुरा धुळे) मोहम्मद जुनैद मुख्तार अन्सारी (वय २८ रा. ग न १४ मक्का मशिदीजवळ, माधवपूरा धुळे) अबरार अहमद अब्दुल सत्तार (वय २७ रा.ग न १४ मक्का मशिदजवळ माधवपुरा धुळे) यांचा समावेश आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उप अधीक्षक राजकूमार उपासे यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले व त्यांचे पथकातील पोहेकॉ गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, रफीक पठाण, विजय शिरसाठ, पोकॉ अनिल शिंपी, मक्सुद पठाण, पंकज जोंधळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *